IND vs SL 1st T20I Live Score Update: सलग दोन चेंडूंत भारताला बसले दोन धक्के, शुभमन-यशस्वी आक्रमक फलंदांजी करुन बाद

या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. तर चारिथ असलंकाला श्रीलंकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Yashasvi and Gill (Photo Credit - X)

IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना शनिवारी (27 जुलै) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातून दोन्ही संघांसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. तर चारिथ असलंकाला श्रीलंकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दरम्यान, श्रीलंकेने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोअर 81/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)