IND vs AUS, 2nd T20 Live Score Update: भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 236 धावांचे लक्ष्य, यशस्वी-किशन आणि ऋतुराज यांची अर्धशतके
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 58 धावांची शानदार खेळी केली.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेट राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. तर ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य मालिकेत बरोबरी साधण्याचे आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 58 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 236 धावा करायच्या आहेत.