India Beat Pakistan In World Cup 2023: पाकिस्तानचा वाईटरीत्या पराभव करत भारताने विश्वचषकात लावली विजयाची हॅट्रीक, रोहित शर्माची 86 धावांची वादळी खेळी
भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा (IND vs PAK) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानकडून बाबर आझम 50 आणि मोहम्मद रिझवानने 49 सार्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सात विकेट्सनी हा सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 86 आणि श्रेयस अय्यरने धावांची दमदार खेळी खेळली. टीम इंडियाचा पुढचा सामना 18 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)