IND vs PAK T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान 'महामुकाबला', आयसासीकडून पंचांची घोषणा

या विश्वचषकासाठी सर्व सामने अधिकारी महिला आहेत.

IND vs PAK (Photo Credit - X)

ICC Women's T20 World Cup 2024: पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एलॉइस शेरीडन आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरेन एजेनबॅग यांची मैदानी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर 6 ऑक्टोबर रोजी खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्याची दूरचित्रवाणी पंच म्हणून वेस्ट इंडिजची जॅकलिन विल्यम्स काम पाहणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. या विश्वचषकासाठी सर्व सामने अधिकारी महिला आहेत. त्यात तीन रेफरी आणि 10 पंचांचा समावेश आहे. भारताकडून जीएस लक्ष्मी मॅच रेफरी असतील, तर वृंदा राठी अंपायरिंगच्या भूमिकेत असतील.