IND vs SA 1st Test Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात भारताने सहा गडी गमावले, केएल राहुल-अश्विन बाद; कोहलीचे अर्धशतक पुर्ण

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सहावा झटका बसला. भारताची धावसंख्या 104-6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement