IND vs AUS 1st Test Day 3 Live Streaming Online: भारताकडे 144 धावांची आघाडी असून रवींद्र जडेजासह अक्षर पटेल क्रीजवर, इथे पाहुन घेवु शकतात सामन्याचा आनंद
भारताकडे 144 धावांची आघाडी असून रवींद्र जडेजासह अक्षर पटेल क्रीजवर आहे. दरम्यान थोड्याचवेळात तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने सात गडी गमावून 321 धावा केल्या. भारताकडे 144 धावांची आघाडी असून रवींद्र जडेजासह अक्षर पटेल क्रीजवर आहे. दरम्यान थोड्याचवेळात तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक वाहिन्यांवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)