IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: भारताला बसला तिसरा धक्का, पुजारानंतर शुभमन गिलही झाला बाद

टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला.

शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला. पुजारानंतर गिल पण आऊट झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 32/3 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement