IND vs NED ICC World Cup 2023 Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, अकरमनला कुलदीपने यादवने केले बाद
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघाने नेदरलँड्सला 411 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी झंजावती शतकीय पारी खेळली. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकीय पारी खेळली.
दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडिया आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील हा सामना बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल. दरम्यान, टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघाने नेदरलँड्सला 411 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी झंजावती शतकीय पारी खेळली. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकीय पारी खेळली. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी नेदरलँड संघाला 50 षटकात 411 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या नेदरलॅंड संघाला दुसरा धक्का बसला आहे. नेदरलॅंडचा स्कोर 66/2
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)