IND vs HK, Asia Cup 2022: हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करून भारताने सुपर-4 मध्ये केला प्रवेश

हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले. हार्दिक पांड्याला आज भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली.

Team India(Photo Credit - Twitter)

हाँगकाँग विरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने 40 धावांनी विजय मिळवला. यासह रोहित आणि कंपनी सुपर-4 मध्ये पात्र झाले आहेत. कांचित शाह 22 चेंडूत 26 धावा करत खेळत होता. यापूर्वी, मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवने या सामन्यात 26 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली होती. सहा षटकार आणि तब्बल चौकार त्याच्या बॅटमधून आले. विराट कोहलीनेही 44 चेंडूत 59 धावा फटकावल्या. आज विराटने तीन षटकारही मारले. तत्पूर्वी, केएल राहुल 36 आणि रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाला. हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले. हार्दिक पांड्याला आज भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement