IND vs AFG 3rd T20I Double Super Over: पुरुषांच्या टी-20 मध्ये दुहेरी सुपर ओव्हर खेळणारा भारत आणि अफगाणिस्तान ठरला पहिला संघ

टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका होती.

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानलाही 212 धावा करता आल्या. यानंतर दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. अखेर भारत जिंकला. दरम्यान दोन सुपर ओव्हरमध्ये जाणारा हा पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement