IND W vs AUS W T20 Semi Final: 'तुम्ही चांगला प्रयत्न केला मुलींनो...'; भारतीय महिला संघाच्या अपयशानंतर Virender Sehwag ने व्यक्त केल्या भावना

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून 172 धावा केल्या.

वीरेंद्र सेहवाग (Photo Credit: Facebook)

भारतीय महिला क्रिकेट संघाचे टी-20 (T-20) विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून 172 धावा केल्या. भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण हा चर्चेचा विषय ठरला. ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताची ही हार अनेकांच्या जिव्हारी लागली आहे. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सेहवाग म्हणतो- ‘क्रीजवर मॅच विनर आणि आज सेमीफायनलमध्ये रन आऊट. आम्हाला यापूर्वीही हार्टब्रेक झाला आहे. भारताला स्पर्धेतून बाहेर पडलेले पाहून वाईट वाटले. ऑस्ट्रेलियाने पुन्हा सिद्ध केले की का त्यांना पराभूत करणे कठीण आहे. मुलींनो तुम्ही चांगला प्रयत्न केला.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement