IND vs ZIM, 1st ODI: झिम्बाब्वेचा संघ 189 धावांवर आटोपला, चहर, पटेल आणि कृष्णा यांनी घेतल्या 3-3 विकेट

यानंतर, संघाने वारंवार अंतराने विकेट गमावल्या आहेत.

Photo Credit - Twitter

भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 40.3 षटकात 189 धावा केल्या आहेत. पहिला सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त 190 धावांची गरज आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार असलेल्या चकाबवाने सर्वाधिक 35 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल, दीपक चहर आणि प्रसिध्द कृष्णाने प्रत्येकी 3 बळी घेतले. झिम्बाब्वेची सुरुवात चांगली दिसत होती, मात्र चहरने 7व्या षटकात इनोसंट कैयाला (4) बाद करून यजमानांना 25 धावांवर पहिला धक्का दिला. यानंतर, संघाने वारंवार अंतराने विकेट गमावल्या आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)