IND vs WI, Women's World Cup 2022: स्मृती मंधाना हीच मास्टर-क्लास! हरमनप्रीत कौर हिच्यासोबत शेअर केली सामनावीरची ट्रॉफी; म्हणाली - ‘आम्ही दोघी पात्र आहोत’
Women's World Cup 2022: भारताची महिला सलामीवीर स्मृती मंधाना हिने अनुकरणीय खेळाडू भावना दाखवून तिची उपकर्णधार आणि सहकारी शतकवीर हरमनप्रीत कौर सोबत तिची ‘सामनावीर’ची ट्रॉफी शेअर केली. उल्लेखनीय म्हणजे, मंधाना आणि हरमनप्रीतच्या विक्रमी 184 धावांच्या भागीदारीमुळे भारताने 317/8 पर्यंत मजल मारली आणि अष्टपैलू गोलंदाजीने वेस्ट इंडिजला प्रत्युत्तरात 162 धावांवर रोखले.
IND vs WI, Women's World Cup 2022: स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने तिची 'प्लेअर ऑफ द अवॉर्ड' ट्रॉफी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सोबत शेअर केली. मिताली राज हिच्या टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिज महिला (West Indies Women) संघाविरुद्ध ग्रुप स्टेजमधील विक्रमी 155 धावांनी विजय मिळवला. स्मृती आणि हरमनप्रीतने 184 धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला तीनशे पार धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. यावर प्रतिक्रिया देत मंधाना म्हणाली की त्या दोघी या पुराकाराच्या पात्र आहेत.
𝗔 𝗧𝗼𝘂𝗰𝗵 𝗢𝗳 𝗖𝗟𝗔𝗦𝗦! 👏 👏@mandhana_smriti shares her Player of the Match award with fellow centurion & #TeamIndia vice-captain @ImHarmanpreet ! 🙌 🙌 #CWC22 | #WIvIND
Scorecard ▶️ https://t.co/ZOIa3KL56d pic.twitter.com/8REiQMSLke
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

