IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या ‘क्लीन स्वीप’वर टीम इंडियाची नजर, ईशान किशन-ऋतुराज गायकवाडची जोडी सलामीला

IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामान्य विंडीज कर्णधार किरोन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिले गोलंदाजीचे आमंत्रण दिले. अशा परिस्थितीत भारतासाठी ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडची नवीन युवा जोडी सलामीला उतरली आहे. तर कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल.

ईशान किशन, ऋतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd T20I: पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) वनडे मालिकेनंतर टी-20 सिरीजमध्ये देखील डबल क्लीन-स्वीपच्या निर्धाराने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात आज टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामान्य विंडीज कर्णधार किरोन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिले गोलंदाजीचे आमंत्रण दिले. अशा परिस्थितीत भारतासाठी ईशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) नवीन युवा जोडी सलामीला उतरली आहे. तर कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement