IND vs WI 2nd T20I Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?

IND vs WI 2nd T20I Live Streaming: वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना 6 गडी राखून जिंकल्यावर टीम इंडिया आज रोहित शर्माच्या नेतृत्वात विजयी आघाडी घेण्याच्या उद्देशाने आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात उतरेल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहाता येतील याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 लाइव्ह स्ट्रीमिंग (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs WI 2nd T20I Live Streaming: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 6 गडी राखून जिंकला होता. संघाने दुसरा सामना जिंकल्यास मालिकेत अजिंक्य आघाडी घेतील. भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 HD, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 HD आणि स्टार स्पोर्ट्स 3 वर सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट पाहू शकतात. तर Disney + Hotstar वर सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement