IND vs WI 2nd ODI Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कसे आणि कुठे पाहणार?

IND vs WI 2nd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर असून त्यांचे लक्ष आजचा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर असेल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा वनडे सामना लाइव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार याबाबत सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

किरोन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तीन सामन्यांची मालिका काबीज करण्याच्या उद्देशाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आज टीम इंडिया (Team India) आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानात उतरेल. भारतीय संघ सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1:00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney + Hotstar अ‍ॅपवर देखील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement