IND vs WI 1st T20I: निकोलस पूरन याचे झुंजार अर्धशतक, वेस्ट इंडिजचे भारतासमोर 158 धावांचे टार्गेट; भारताचा नवोदित रवी बिष्णोई पण चमकला
IND vs WI 1st T20I: भारताविरुद्ध पहिल्या टी-20 वेस्ट इंडिज संघाने निकोलस पूरन याच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 157/7 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. एका टोकाने विकेट पडत असताना पूरनने संयमाने फलंदाजी केली आणि भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी पल्ला गाठला. पूरनने सर्वाधिक 61 धावा ठोकल्या. दुसरीकडे, भारताकडून पदार्पण केलेल्या रवी बिष्णोईने 2 विकेट घेतल्या.
IND vs WI 1st T20I: भारताविरुद्ध (India) पहिल्या टी-20 वेस्ट इंडिज संघाने निकोलस पूरन याच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 157/7 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. एका टोकाने विकेट पडत असताना पूरनने संयमाने फलंदाजी केली आणि भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी पल्ला गाठला. पूरनने सर्वाधिक 61 धावा ठोकल्या तर कर्णधार किरोन पोलार्ड 24 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, भारताकडून पदार्पण केलेल्या रवी बिष्णोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)