IND vs SL 3rd T20I: मैदानात उतरताच ‘हिटमॅन’च्या नावावर सर्वात मोठा विक्रम, पाकिस्तानी दिग्गज खेळाडूला मागे टाकून यादीत बनला नंबर 1 क्रिकेटपटू

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आणखी एक सर्वकालीन विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीलंकाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकसाठी मैदानात उतरताच झटपट क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक सामने खेळाडू बनला आहे. शर्माने रविवारी 125 वा टी-20 खेळून एलिट यादीत पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकला मागे टाकले. रोहित हा एकमेव भारतीय आहे ज्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I: रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या 125व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेकसाठी मैदानात उतरला आणि त्याने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकला (Shoaib Malik) टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने (Most Capped T20 Players) खेळणाऱ्या यादीत मागे ढकलून नंबर 1 चे सिंहासन काबीज केले. भारतीय कर्णधार देशातील एकमेव खेळाडू आहे ज्याने 100 पेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement