Ind vs SL 2023: भारतीय संघाची घोषणा; T20 मधून अनेक सीनियर्सला वगळले, हार्दिक पंड्या वनडेचा उपकर्णधार, ऋषभ पंत बाहेर

मात्र रोहित वनडेद्वारे मैदानात परतणार आहे.

रोहित शर्मा व हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

नवीन वर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध आपली पहिली मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून मुंबईत टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघ जाहीर केला आहे. तंदुरुस्त नसल्यामुळे रोहित शर्मा टी-20 मालिकेत सहभागी होणार नाही. मात्र रोहित वनडेद्वारे मैदानात परतणार आहे. आज एकदिवसीय मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे.

टी-20 मालिका-

बीसीसीआयने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात इशान किशनला यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. ऋषभ पंत संघाचा भाग नाही. यासोबतच मुकेश कुमारलाही टी-20 संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि केएल राहुल या संघाचा भाग नाहीत. सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

एकदिवसीय सामने-

रोहित शर्मा संघाचा कर्मधार असेल. केएल राहुलला भारतीय वनडे संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी आली आहे. यासोबतच शिखर धवनही संघाचा भाग नाही. पंतही वनडे संघात नाही. केएल राहुलसोबत इशान किशनला यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)