IND vs SL 1st Test: आऊट होताच विराट कोहली याच्या चेहऱ्याचा उडाला रंग, तर रोहित शर्माने दिली अशी प्रतिक्रिया, मोहाली कसोटीतील Video व्हायरल

विराटला श्रीलंकेच्या लसिथ एम्बुडियाने बाद केले. विराटने 76 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या आणि क्लीन बोल्ड झाला. रोहितच्या प्रतिक्रियेवरून तोही विराटच्या 71 व्या शतकाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून आले.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या 100 व्या कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावांवर बाद झाला. विराटला श्रीलंकन फिरकीपटूने बाद केले तेव्हा तो स्वतःच अवाक झाला नाही, तर कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) कपाळाला हात लावला होता. विराट दोन वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा करत आहे आणि टीम इंडिया (Team India) व चाहत्यांना आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात नक्कीच असे करेल अशी आशा होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif