IND vs SL 1st Test: काय सांगता! Virat Kohli शिवाय हे दोन खेळाडूही खेळत आहेत 100 वा सामना, जाणून घ्या नावे

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे, पण तुम्हाला माहिती आहे की या सामन्यात कोहलीशिवाय भारतीय हनुमा विहारी आणि श्रीलंकेचा धनंजय डी सिल्वा, हे दोघेही 100 वा सामना खेळत आहेत.

हनुमा विहारी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 1st Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जात आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे, पण तुम्हाला माहिती आहे का या सामन्यात कोहलीशिवाय आणखी दोन खेळाडू आहेत जे त्यांचा 100 वा सामना खेळत आहेत? कदाचित नाही. हे दोन खेळाडू म्हणजे भारतीय हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रीलंकेचा धनंजय डी सिल्वा (Dhananjaya de Silva). हे दोघेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 100 वा सामना खेळत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)