IND vs SL 1st Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसा पाहणार?

IND vs SL 1st Test Day 2 Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज मोहाली कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. पहिल्या दिवशी फलंदाजीला येत टीम इंडियाने दिवसाखेर 357/6 धावांपर्यंत मजल मारली. तर श्रीलंका गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करायला भाग पाडले. अशा परिस्थितीत आज यजमान संघ स्कोर बोर्डवर मोठी धावसंख्या उभारून लंकन संघाला लवकर गुंडाळण्याचे प्रयत्न करेल.

भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज मोहाली कसोटी (Mohali Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट प्रसारित केला जाईल. तसेच जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पहायचे असल्यास तुम्ही Disney + Hotstar अॅप किंवा वेबसाइटवर पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement