IND vs SL 1st Test Day 1: विराट कोहली 8000 कसोटी धावा करणारा सहावा भारतीय फलंदाज, दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला समावेश

एकूणच, कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा कोहली हा 33वा फलंदाज ठरला आहे. उल्लेखनीय म्हणजे, 100 कसोटी सामने खेळणारा कोहली 12वा भारतीय आहे

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मोहाली (Mohali) येथील PCA स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने (Virat Kohli) शुक्रवारी आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात आणखी एक विशिष्ट विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा कोहली 6 वा भारतीय फलंदाज आणि हा टप्पा गाठणारा देशातील पाचवा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. यासह विराट सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या एलिट यादीत सामील झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)