IND vs SL 1st T20I: श्रीलंकेचा टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; ‘रोहितसेने’त तीन अष्टपैलू खेळाडू, असा आहे टीम इंडिया प्लेइंग XI

श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचा आमंत्रण दिले. या सामन्यासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहचे आगमन झाले आहे तर अष्टपैलू दीपक हुडाने एकदिवसीय क्रिकेटनंतर टी-20 मध्ये पदार्पण केले आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I: भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकाई कर्णधार दासून शनकाने नाणेफेक जिंकली. श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचा आमंत्रण दिले. या सामन्यासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराहचे आगमन झाले आहे तर अष्टपैलू दीपक हुडाने (Deepak Hooda) एकदिवसीय क्रिकेटनंतर टी-20 मध्ये पदार्पण केले आहे. तसेच ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला बाहेर करण्यात आले असून संजू सॅमसन त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.

भारत प्लेइंग XI: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)