IND vs SA: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय, मिलर-मार्कराम ठरले सामन्याचे हिरो
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आणि त्यामुळे स्पर्धेतील भारताचा विजय थांबला.
पर्थच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा महत्त्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आणि त्यामुळे स्पर्धेतील भारताचा विजय थांबला. कमी धावसंख्येचा हा सामना शेवटच्या षटकात विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेने जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही, कारण तो स्वत: आधी बाद झाला आणि नंतर विकेट पडू लागल्या. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 133 धावा करता आल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)