IND vs SA 3rd Test Day 2: कसोटी क्रिकेटमध्ये Virat Kohli ने पूर्ण केले ‘हे’ खास शतक, अशी कमाल करणारा ठरला सहावा भारतीय

कोहलीने केपटाउनमधील तिसर्‍या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची महत्त्वपूर्ण भागीदारी तोडण्यासाठी अप्रतिम झेल घेतला आणि 100 कसोटी कॅचेजचा टप्पा गाठला. टेंबा बावुमाच्या बॅटच्या कडेला लागून मागे आलेला चेंडू कोहलीने डावीकडे डाइव्ह मारून पकडला.

विराट कोहली कॅच घेताना (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 3rd Test Day 2: भारताचा (India) नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीने  (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधील 100 वा झेल घेऊन देशाच्या एलिट क्षेत्ररक्षकांच्या यादीत सामील झाला. कोहलीने तिसर्‍या केपटाउन (Cape Town) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची (South Africa) महत्त्वपूर्ण भागीदारी तोडण्यासाठी अप्रतिम झेल घेतला आणि 100 कसोटी कॅचेजचा टप्पा गाठला. टेंबा बावुमाच्या (Temba Bavuma) बॅटच्या कडेला लागून मागे आलेला चेंडू कोहलीने एका हाताने डावीकडे डाइव्ह मारून पकडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)