IND vs SA 2nd Test Day 4: दिवसाचे दुसरे सत्रही पावसाने वाया; भारतीय वेळेनुसार आता 7:15 वाजता सामन्यास सुरुवात, दक्षिण आफ्रिकेला 122 धावांची गरज

जोहान्सबर्गमध्ये पाऊस थांबला आहे पण, दिवसाच्या चहापानाची घोषणा करण्यात आली असल्यामुळे एकही चेंडू न खेळता दुसरे सत्रही वाया गेले आहे. दरम्यान CSA ने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता सामना सुरू होईल आणि आज एकूण 34 षटके खेळली जातील.

इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 2nd Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर आहे. जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) पाऊस थांबला आहे. एकही चेंडू न खेळता दुसरे सत्र देखील वाहून गेले आहे परंतु कव्हर्स पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत आणि मैदान सुखावण्याचे काम सुरु आहे. दरम्यान CSA ने दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता सामना सुरू होईल आणि आज एकूण 34 षटके खेळली जातील. भारताने 240 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर यजमानांना चौथ्या दिवशी आणखी 122 धावांची गरज आहे.