IND vs SA 2nd Test Day 3: लंचपर्यंत दक्षिण आफ्रिका गोलंदाजांची झुंज; पहिल्या सत्रात 4 विकेट गमावून भारताचा स्कोर 188/6

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी भारताच्या अडचणीत वाढ केली आहे. आर अश्विनच्या रूपात संघात आता चौथा धक्का बसला आहे. लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर अश्विन विकेटकीपर काइल वेरेनकडे झेलबाद होऊन माघारी परतला. अश्विन 14 चेंडूंचा सामना करत 16 धावा केल्या. 44 षटकांनंतर भारताचा स्कोर 188/6 आहे. 

लुंगी एनगीडी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johanesburg Test) तिसऱ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत यजमान दक्षिण आफ्रिकी (South Africa) गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. भारताने दिवसाच्या सुरुवातीला  दोन विकेट गमावल्या होत्या, पण संपूर्ण सत्रात आणखी चार विकेट घेत टीम इंडियाला (Team India) बॅकफूटवर ढकलले आहे. दुपारच्या जेवणापर्यंत 44 षटकांनंतर भारताचा स्कोर 188/6 आहे. अशाप्रकारे त्यांची आफ्रिकी संघावर आघाडी 161 धावांवर पोहोचली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now