IND vs SA 1st Test: सेंच्युरियन कसोटीत विराट कोहलीने जिंकला टॉस, भारताचा पहिले फलंदाजीचा निर्णय; ‘या’ 11 धुरंधरांसह टीम इंडिया मैदानात

दिवसाच्या सुरुवातीला भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन अष्टपैलू या संयोजनासह मैदानात उतरणार आहे.

डीन एल्गर आणि विराट कोहली (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs SA 1st Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरू होणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन अष्टपैलू या संयोजनासह मैदानात उतरणार आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (पंत), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

यजमान दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सन आज कसोटी पदार्पण करत आहे

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), विआन मुल्डर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)