IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियनमध्ये पावसामुळे दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला विलंब, हवामान टीम इंडियासाठी ठरू शकते डोकेदुखी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सेंच्युरियनमध्ये पावसामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ उशीराने सुरू होणार आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी कव्हर्सवर बरेच पाणी साचले असून सुपरसॉपर्सच्या माध्यमातून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
IND vs SA 1st Test Day 2: सततच्या पावसामुळे सेंच्युरियनमध्ये भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर झाला. केएल राहुल (KL Rahul) नाबाद 122 आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 40 धावा करून खेळत आहेत. तर पहिल्या दिवसाखेर भारताने 272/3 धावा करून सामन्यात आतापर्यंत वर्चस्व गाजवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)