IND vs PAK Asia Cup 2022: भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; PM Narendra Modi यांनी केले संघाचे अभिनंदन (See Tweet)

या विजयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 मध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये थरारक सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 19.5 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. आता या विजयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले- ‘आजच्या आशिया कप 2022 च्या सामन्यात भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केली. संघाने उत्कृष्ट कौशल्य आणि धैर्य दाखवले आहे. विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन.’

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement