IPL Auction 2025 Live

IND vs PAK Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय; 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले 148 धावांचे लक्ष्य

148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले.

IND vs PAK Asia Cup 2022

आशिया चषक 2022 च्या पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 19.5 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अवघ्या 10 रनामध्ये बाद झाल्याच्या धक्क्यातून पाकिस्तानी संघ सावरू शकला नाही आणि ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडत राहिल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन विकेट घेतल्या. केएल राहुलच्या रूपाने भारतीय संघाने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 46 चेंडूत 49 धावांची भागीदारी झाली. विराट 35 आणि रोहित 12 धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने जडेजासोबत चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 36 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 18 धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिकसह जडेजाने भारताला विजयाच्या जवळ नेले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 29 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात 35 धावा काढून जडेजा बोल्ड झाला. मात्र हार्दिकने षटकार ठोकत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)