IND vs NZ WTC Final 2021: केन विल्यमसनची एकाकी झुंज, न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर आटोपला; भारताविरुद्ध घेतली 32 धावांची आघाडी

इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीच्या वेगवान जोडीने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड संघाचा पहिला डाव 249 धावांवर गुंडाळला आहे. अशाप्रकारे किवी संघाने पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) वेगवान जोडीने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड (New Zealand) संघाचा पहिला डाव 249 धावांवर गुंडाळला आहे. अशाप्रकारे किवी संघाने पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एकाकी झुंज दिली.  विल्यमसनने 177 चेंडूत 49 धावांची खेळी केली. दुसरीकडे, भारताकडून शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच इशांतला 3 आणि रविचंद्रन अश्विनला 2 विकेट्स मिळाल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement