IND vs NZ 2nd Test Day 2 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने घेतली 188 धावांची आघाडी, भारत बॅकफूटवर

दुसऱ्या दिवसाचा टी-ब्रेक झाला असुन न्यूझीलंडने 20 षटकांत 2 गडी गमावून 85 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम 37 धावा करून नाबाद आहे. रचिन रवींद्र 7 धावा करून नाबाद आहे. भारताकडून अश्विनने एक आणि सुंदरने एक विकेट घेतली.

IND vs NZ 2nd Test Day 2 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने घेतली 188 धावांची आघाडी, भारत बॅकफूटवर
IND vs NZ (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला आहे. यासह न्यूझीलंडने 103 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा टी-ब्रेक झाला असुन न्यूझीलंडने 20 षटकांत 2 गडी गमावून 85 धावा केल्या आहेत. टॉम लॅथम 37 धावा करून नाबाद आहे. रचिन रवींद्र 7 धावा करून नाबाद आहे. भारताकडून अश्विनने एक आणि सुंदरने एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2024 02:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).