IND vs NZ 2nd T20I 2021: रोहित शर्माचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; Harshal Patel करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण, पहा कोण IN कोण OUT

भारत आणि न्यूझीलंडच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात रांची येथे भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि JSCA स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल झाला आहे. भारतासाठी आजच्या सामन्यातून आयपीएल 2021 चा घातक गोलंदाज हर्षल पटेलने टी-20 पदार्पण केले आहे.

रोहित शर्मा आणि टिम साऊदी (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd T20I 2021: भारत (India) आणि न्यूझीलंडच्या (New Zealand) मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात रांची येथे भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Shrama) टॉस जिंकला आणि JSCA स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे, त्यामुळे गेल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. भारतासाठी आजच्या सामन्यातून आयपीएल 2021 चा घातक गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Petel) टी-20 पदार्पण केले आहे. हर्षलला संधी देण्यासाठी दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजला बाहेर केले आहे.

भारत प्लेइंग XI

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.

न्यूझीलंड प्लेइंग XI

टिम साउदी (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), जेम्स नीशम, ईश सोढी, मिचेल सँटनर, अ‍ॅडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement