IND vs NZ 1st Test: कानपुरमध्ये Shreyas Iyer याची धमाल, कसोटी पदार्पणात ‘ही’ कमाल करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज

श्रेयस अय्यर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 10 वा फलंदाज आणि कसोटी पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. सुनील गावस्कर आणि दिलावर हुसेन यांच्यानंतर कसोटी पदार्पणात दोन पन्नास पेक्षा जास्त धावा करणारा श्रेयस तिसरा भारतीय ठरला. भारताची दुसऱ्या डावात 51 धावांवर 5 बाद अशी स्थिती असताना अय्यरने संयमाने फलंदाजी करून किवी गोलंदाजांची क्लास घेतली.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

26 वर्षीय श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) रविवारी इतिहास रचला आणि कसोटी पदार्पणात शतक आणि त्याच्या पाठोपाठ अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. कानपूर (Kanpur) येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत भारताला संकटातून बाहेर काढताना अय्यरने आपली मानसिक शक्ती आणि चारित्र्यचे दर्शन घडवून दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement