IND vs NZ 1st Test: कानपुर कसोटीपूर्वी टीम इंडियाला तगडा झटका, पहिल्या सामन्यातून KL Rahul आऊट
भारताचा सलामीवीर केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्याचे वृत्त समोर आले आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत ट्विट केले की दुखापतीमुळे राहुल पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुलने टी-20 मालिका खेळली जी भारताने 3-0 ने जिंकली. 25 नोव्हेंबरपासून (गुरुवार) कानपूरमध्ये पहिली कसोटी सुरू होणार आहे.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारतीय सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) मंगळवारी पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड आणि यजमान भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामना 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)