Ashwin Breaks Harbhajan Singh Record: रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा तिसरा यशस्वी गोलंदाज, हरभजन सिंहला एलिट यादीत केले ओव्हरटेक

आर अश्विनने शनिवारी कानपूर येथे पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद केले आणि भारताचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा हरभजन सिंहला मागे टाकले. अश्विनच्या कारकिर्दीत 418 विकेट्स झाल्या तर हरभजनच्या नावावर खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये 417 विकेट्स आहेत. अश्विनने टॉम लॅथमला बाद करून त्याचा 418 वा कसोटी बळी मिळवला.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सोमवारी त्याची 418 वी कसोटी विकेट घेतली आणि भारतासाठी सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याने हरभजन सिंहला (Harbhajan Singh) मागे टाकले, ज्याच्या नावावर 417 विकेट्स आहेत आणि तो आता फक्त कपिल देव (434) आणि अनिल कुंबळे (619) यांच्या मागे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement