IND vs NZ 1st Test Day 5 Live Update: बंगळुरूमधून आनंदाची बातमी, पंचाकडून तपासणी पूर्ण; 10:15 वाजता सुरु होणार सामना

पंचाकडून तपासणी पूर्ण झाली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सकाळी 10.15 वाजता सुरू होईल.

IND vs NZ (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पण फक्त 4 चेंडू खेळू शकला. आता भारताला जिंकण्यासाठी 10 विकेट लवकर काढाव्या लागतील. पण हा सामना सध्या न्यूझीलंडच्या बाजूने आहे. दरम्यान, बंगळुरूमधून एक चांगली बातमी समोर येत आहे. पंचाकडून तपासणी पूर्ण झाली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सकाळी 10.15 वाजता सुरू होईल.