IND vs ENG, World Cup 2023 Live Score Update: टीम इंडियाने इंग्लंडसमोर ठेवले 230 धावांचे लक्ष्य, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची शानदार खेळी

इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 29 वा सामना आज लखनौमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.

भारताकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (9) विराट कोहली (0) आणि श्रेयस अय्यर (4) धावांकरुन लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल सोबत कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला पंरतू यानंतर 39 धावांकरुन केएल राहुल बाद झाला. यानंतर रोहित शर्माही 87 धावाकरुन बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 49 धावा केल्या. भारताने 50 षटकांत 9 बाद 229 धावा केल्या.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)