IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी, Lunch पर्यंत केल्या 182 धावा; भारताविरुद्ध पहिल्या डावात इतक्या धावांची आघाडी

भारताला दिवसाच्या पहिल्या सत्रात रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांच्या रूपात दोन विकेट्स मिळाल्या. बर्न्सने 61 तर हमीदने 68 धावा केल्या. दुपारच्या जेवणापर्यंत डेविड मलान 27 आणि कर्णधार जो रूट 14 धावा करून खेळत होते.

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 2: भारताविरुद्ध (India) इंग्लंडने (England) लीड्स कसोटी  (Leeds Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत 2 बाद 182 धावा केल्या आणि 104 धावांनी आघाडी घेतली. भारताला दिवसाच्या पहिल्या सत्रात रोरी बर्न्स (Rory Burns) आणि हसीब हमीद  (Haseeb Hameed) यांच्या रूपात दोन विकेट्स मिळाल्या.