IND vs BNG: केएल राहुलने खतरनाक लिटन दासला अचूक थ्रो मारून पॅव्हेलियनमध्ये पाठवले, 'हा' सामन्याचा ठरला टर्निंग पाईंट (Watch Video)
यानंतर सामना सुरू झाला तेव्हा बांगलादेशसमोर 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य होते. लिटन दास क्रीजवर होता.
आजच्या सामन्यात बांग्लादेशचा फलंदास लिटन दासने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक ठोकून भारतापासून दूर सामन्याची सुरुवात केली. पावसामुळे बराच वेळ खेळ थांबला होता. यानंतर सामना सुरू झाला तेव्हा बांगलादेशसमोर 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य होते. लिटन दास क्रीजवर होता. मात्र खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नजमुल हुसेन शांतोने डीपमध्ये खेळला. सलग दोन धावा काढतील असे फलंदाजांना वाटत होते पण तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या केएल राहुलने (KL Rahul) जोरदार थ्रो मारला. त्याचा चेंडू थेट विकेटला नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला लागला. लिटन दास क्रीजपासून दूर असल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. संपुर्ण सामन्यात 'हा' सामन्याचा टर्निंग पाईंट ठरला.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)