IND vs BAN Asia Cup 2023 Live Score Update: बांगलादेशने भारतासमोर ठेवले 266 धावांचे लक्ष्य, शाकिब-तौहीदची अर्धशतके

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 266 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.

टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 266 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement