Ind Vs Aus ODI Series India's Squad: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती
रोहित शर्मा आणि विराट कोहली तिसऱ्या वनडेत परतणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल.
भारतीय संघ 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यासाठी पुरुष भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली आहे. एकदिवशीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून मालिकेतील पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुल भारताचे नेतृत्व करेल, तर रवींद्र जडेजा त्याच्या उपकर्णधाराची भूमिका बजावेल. दरम्यान, संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे.
मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली तिसऱ्या वनडेत परतणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करेल. त्याचवेळी, नियमितपणे संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक पंड्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दिसणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज (हेही वाचा: Sri Lanka Squad For Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी श्रीलंकेने त्यांच्या पुरुष संघाची केली घोषणा, सहान अरचिगेकडे कर्णधारपदाची धुरा)
Rohit Sharma, Virat Kohli, Hardik Pandya rested for first two ODIs against Australia, full strength squad picked for third and final game
— Press Trust of India (@PTI_News) September 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)