IND A vs PAK A, ACC Asia Cup 2023 LIVE Streaming: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत आज पाहयला मिळणार भारत-पाकिस्तान थरार, येथे पाहू शकता तुम्ही रोमांचक सामना
त्याचवेळी कोलंबोतील आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ खेळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल.
ACC Mens Emerging Asia Cup 2023: एसीसी मेन्स इमर्जिंग आशिया चषक 2023 (ACC Mens Emerging Asia Cup 2023) मध्ये, 19 जुलै रोजी भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (IND A vs PAK A) यांच्यात सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजल्यापासून हा सामना दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. त्याचवेळी कोलंबोतील आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ खेळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एसीसी मेन्स इमर्जिंग आशिया चषक 2023 च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध आहे. तर चाहते फॅन कोडवर सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग सहज पाहू शकतात. (हे देखील वाचा: Asia Cup 2023 Draft Schedule: आशिया कप 2023 चे ड्राफ्ट वेळापत्रक समोर, 'या' दिवशी होऊ शकतो भारत-पाकिस्तान सामना)
दोन्ही संघांचे खेळाडू
भारत अ: यश धुल (कर्णधार), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, निशांत सिंधू, मानव सुथार, युवराज सिंग डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीश कुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर, रियान पराग
पाकिस्तान अ: मोहम्मद हारिस (कर्णधार/यष्टीरक्षक), ओमेर युसूफ (उरकर्णधार), अमद बट, अर्शद इक्बाल, हसिबुल्ला खान, कामरान गुलाम, शाहनवाज दहनी, मेहरान मुमताज, मुबासिर खान, मोहम्मद वसीम जूनियर, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सैम अयुब , सुफियान मुकीम, तय्यब ताहीर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)