India Beat New Zealand: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी केला पराभव, मालिका 2-1 अशी जिंकली
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 126 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 12.1 षटकात अवघ्या 66 धावांत गारद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.