NZ Beat SA, 2nd Test: दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव, मालिका 2-0 ने घातली खिशात

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. 267 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने 94.2 षटकांत केवळ तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

NZ Beat SA, 2nd Test: न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी (NZ vs SA 2nd Test) हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कवर खेळली गेली. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. 267 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने 94.2 षटकांत केवळ तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक नाबाद 133 धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार नील ब्रँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 242 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ 211 धावा करू शकला. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने 31 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 235 धावांवर आटोपला. अशाप्रकारे न्यूझीलंडला दुसरी कसोटी जिंकण्यासाठी 267 धावांचे लक्ष्य मिळाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement