IND vs SA 2nd T20I: दुसऱ्या झालेल्या टी-20 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर केलेल्या विजयात अनेक विक्रम मोडीत काढले
दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या.
तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत मालिका जिंकली. आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी20 मध्ये भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करू शकला. मात्र, एका क्षणी मिलर आणि डी कॉक भारताकडून हा सामना हिसकावून घेतील असे वाटत होते. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 106 धावा केल्या. दरम्यान या झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर केलेल्या विजयात अनेक विक्रम मोडीत काढले.