IND vs AUS 2nd T20 Toss Update: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा.