IND vs BAN 2nd T20I Live Toss Update: दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगालदेशच्या बाजूने, भारताला फलंदाजीसाठी केले आमंत्रित
टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी उभय संघांमध्ये दुसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. दुसरीकडे, टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान